" ऐ , दया.... पंधराह कटिंग देना "
" हा , अभी देता हुँ..."
नुकताच १०.३० चा ब्रेक झाला होता.आणि हळू-हळू सगळी पोरं चहाच्या टपरीवर जमायला लागली होती...अन्यानें पहिल्यांदाच चहाची ऑर्डर देऊन ठेवली होती...श्रेया , आश्या, रम्या, सौऱ्या आणि त्यापाठोपाठ हळू-हळू एक वीसेक पोरं टपरीवर जमा झाली आणि सगळ्यांनी आपापला चहाचा कप पटापट उचलून , चहावर ताव मारता-मारता थट्टा मस्करी चालू होती.
" ये, ऐका ना...." अन्या बोलत होता.
वीसेक पोरांच्या घोळक्यात अन्या दिसत नव्हता, पण आवाज सगळ्यांच्या परिचयाचा होता.
" ये , ऐका ना...मी काय म्हणतो...?"
"बोल ....बारक्या.." वाक्याला मध्येच तोडून श्रेया बोलला, आणि एकच हशा पिकला...हळू-हळू सगळे शांत झाले..अन् अन्या बोलायला लागला.
" यावर्षीचा स्वातंत्रोत्सव आपण सगळ्यांनी एका वेगळा पद्धतीने साजरा करायचा का ?"
"पण, करायचं काय नेमकं ?" पंक्या चहाचा भुरका मारत विचारत होता.
" माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण यावर्षीचा स्वातंत्रोत्सव एखाद्या अनाथाश्रमात साजरा करायचा का?"
"हा , तेवढाच राहिलाय आता.." मध्येच कुठूनतरी परत श्रेयाचा आवाज येत होता.परत सगळी मन-मुराद हसली.
"ये, श्रेया गप ना..बाबा..मी सिरीयस आहे."असे म्हणत अन्यानें श्रेयाला एक शिवी हासडली..परत पोरं ,खळखळून हसली...
" हा,तू बोल अन्या... श्रेया गप ना.."सौऱ्या बोलत होता.
"माझ्या नजरेत एक अनाथाश्रम (मती-मंद मुलांची शाळा) आहे.तिथं जाऊन यावेळेस आपण त्यांना मदत करू.."
सर्वांनी अन्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.
"मग, आताच जाऊन तिकडे चौकशी केली तर.."श्रेया गंभीरतेने बोलत होता.
"हो...चालेल की.."
"मग, तेवढं बिल दे..लगेच निघू.." आश्या बोलून गेला.
अन्याने परत शिवी हासडली अन बिल दिलं.. सगळी परत मन-मुराद हसली.
किका बसल्या...गाड्या निघाल्या...कॉलेज बंक करून..
" खरतरं, ज्या समाजात आपण राहतो..त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो..हीच बांधिलकी जपत पोरांनी अनोख्या पद्धतीनं स्वातंत्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता..युवा पिढीला दोष देणाऱ्या मुस्काटात , चपराक बसली होती.."
" पत्ता विचारात-विचारात आम्ही योग्य त्या पत्त्यावर पाहोचलो..गाड्या बाहेर लावल्या ..ऐक 2 गुंठ्याचा प्लॉट असेल..त्यांची कठड्याची भिंत म्हणून सगळीकडे पत्रे बसवलेले होते..आणि गेटही पत्रयाचेच होते..हळू-हळू आम्ही आतमध्ये गेलो..खोरे आमच्या सोबतच होता..खोरे म्हणजे आमचा अधिकृत " वक्ता "..! आम्ही आधीच कल्पना देऊन ठेवली होती..त्यामुळे त्यांचा एक माणूस आम्हाला घ्यायला होता ...आम्ही ऑफिस मध्ये प्रवेश केला..आणि स्थानापन्न झालो..खोरेनी तेथील मुख्याध्यापिकेला शाळेविषयी माहिती विचारात होता..मी ऑफिस न्याहाळत होतो..ऑफिस मध्ये भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,महात्मा गांधी आणि बऱ्याच महापुरुष्यांच्या प्रतिमा होत्या..भिंतीवर मध्यभागी , अगदी दर्शनीय ठिकाणी..एक मोठी प्रतिमा लावली होती..माझ्यासाठी एक अनोळखी व्यक्ती...नाव होतं..."हेलन केलर"( Hellen Keller).. अन डोक्यात विचारांचं काहूर माजलं... कोण असेल ही व्यक्ती?एवढी मोठी प्रतिमा का लावली असेल?काय काम केलं असेल नेमकं हीने ?
अश्या असंख्य विचारांनी मनात गोंधळ घातला होता.म्हणून मी बाहेर उठून गेलो..परत पाणी आणि चहा आला...चहा पीत-पीत मी शाळा फिरत होतो...किरण्या आणि श्रेया बाहेरच बसली होती.
शाळेत एक किचन , टी. व्ही. रूम होती,लॉकर चे दरवाजे तुटले होते..एका पत्र्याच्या शेड मध्ये या मुलांच्या डंबल्सची प्रॅक्टिस चालू होती...१५ ऑगस्ट ची तयारी...काही मुलांना जमत नव्हते..त्यांचं हात पाय म्हणेल असं हलत नव्हतं... पण हि मूले जिद्दीनं ती प्रॅक्टिस करत होती...मला चहा संपल्याची जाणीव झाली अन मी परत फिरलो..मनात एकच प्रश्न , हि " हेलन केलर " कोण ?? तेवढयाच हि पोरं सगळी तयारी...बोलणी...आणि कार्यक्रमाची आखणी करून बाहेर आली होती...
"तुझं माझं बाजूला सारून, पोरं त्या मती-मंद मुलांचा आधार व्हायला तयार झाली व्हती..
ज्यांना त्यांच्या आई-वडिलांनी झिडकारले व्हतं,
त्यानां हि पोरं, आपलंसं करायला चालली व्हती..
कार्यक्रम ठरला..वेळ ठरली..अन १५ ऑगस्ट च्या अनोख्या स्वातंत्रोत्सवचा बिगुल वाजला होता.."
समाजाचं आपण देण लागतो यातून मुलांनी एकत्र येऊन उभा केलेला हा प्रपंच....!!!
आणि आज थाटात उभा राहिलाय "मैत्री - युवा फाऊंडेशन" चा हा वटवृक्ष....!!!!!
©शब्द मांडणी - सोमनाथ मोहिते.
www.srmohite.blogspot.com